‘या’ शेतकऱ्यांना मिळणारं प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील निम्म्याहून नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर (Business) चालतो. म्हणूनच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) नेहमीच जबरदस्त निर्णय घेऊन दिलासा देते. आज गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी विधीमंडळात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार 15 हजार रुपये बोनस
एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी (Agricultural Information) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल 15 हजार रुपयांचा बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनात जाहीर केले आहे. धान उत्पादक जवळपास 5 लाखांहून शेतकऱ्यांना 15 हजार रुपये थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
70 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीकरता 755 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. अमरावती, नागपूर पुणे विभागातील 14 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित विदर्भ आणि मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. 70 हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा टप्पा-2 अंतर्गत 6 हजार कोटींचा लाभ देणार,‘मित्र’ संस्था 1 जानेवारीपासून सुरू होईल,राज्याची आर्थिक सल्लागार परिषद स्थापन्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील नियम 293 च्या उत्तरात केली आहे.