शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार 15 लाख, त्वरित करा अर्ज
Yojana | भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, हवामानाच्या तडाख्यापासून आपली पिके वाचवण्यासाठी आणि बाजारात नेण्यासाठी या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम किसान एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana) आणली. या योजनेअंतर्गत, 11 शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजेच शेतकरी (Agriculture) उत्पादक संघटना (FPO/FPC) यांना शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय (Business) सेटअपसाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
काय आहे उद्दिष्ट?
शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे हा यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक (Financial) संकटातून मुक्त करणे हे पीएम किसान एफपीओ योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना (Department of Agriculture) मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत. FPO ही शेतकरी आणि उत्पादकांची एकात्मिक संघटना आहे जी शेतकऱ्यांसाठी काम करते.
काय आहे सरकारचे लक्ष्य?
- शेतकऱ्यांच्या आर्थिक (Financial) विकासासाठी आणि कल्याणासाठी 2023-24 पर्यंत सरकारने 10,000 FPO तयार करणे.
- शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी आणि बाजारातून योग्य परतावा मिळावा यासाठी ठोस पावले उचलली जातात.
- नवीन FPO ला 5 वर्षांपर्यंत सरकारकडून हात धरून आणि समर्थन प्रदान करणे.
- आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी-उद्योजक कौशल्ये विकसित करणे.
कसा करावा अर्ज?
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला https://www.enam.gov.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही FPO पर्यायाचे पेज उघडाल जिथे क्लिक केल्यावर नोंदणी किंवा लॉगिनसह नवीन पेज उघडेल. येथे सर्व माहिती भरून तुम्ही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकता.