शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डीबीटीमध्ये ‘या’ 14 योजनांचा समावेश, आता एकाच अर्जावर मिळणारं लाभ


 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डीबीटीमध्ये ‘या’ 14 योजनांचा समावेश, आता एकाच अर्जावर मिळणारं लाभ


Yojana | शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ एकाच अर्जावर मिळणारं आहे. म्हणून आता शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे. शेतकऱ्यांना (Department of Agriculture) प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र्य अर्ज करावा लागत होता. मात्र आता 14 योजनांचा लाभ (Financial) एकाच एकाच अर्जावर होणार आहे. कारण या 14 योजनांचा समावेश ‘डीबीटी’मध्ये करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सहज मिळणार लाभ
शेतकऱ्यांना आता 14 योजनांचा लाभ डीबीटीवर मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना (Agricultural Information) प्रत्येक योजनेकरता वेगळा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. कारण शेतकरी आपल्या अर्जात बदल करून इतर योजनांचा लाभ घेऊ शकतात. डीबीटीद्वारे शेतकरी (Types of Agriculture) लॉटरी पद्धतीने निवडले जातात. अर्ज भरताना शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्याची निवड करावी लागेल.

14 योजनांचा समावेश
• राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामुहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन)
• मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)
• बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)
• राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना (अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे
• भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान)
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (50 टक्के अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट)
• राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ)
• राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, आवजारे)
• कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, आवजारे)
• राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व आवजारे 40 टक्क्यांपर्यंत अनुदान).)

Post a Comment

Previous Post Next Post