MrJazsohanisharma

शेतकऱ्यांनो ‘या’ खताच्या वापरामुळे पीक येईल जोमात, सरकारनेही ठेवलंय 1 कोटी मेट्रिक टन खत उत्पादनाचं उदिष्ट

 

agriculture maharashatra satbara.com satbara.in satbara.co.in

शेतकऱ्यांनो ‘या’ खताच्या वापरामुळे पीक येईल जोमात, सरकारनेही ठेवलंय 1 कोटी मेट्रिक टन खत उत्पादनाचं उदिष्ट


Fertilizer | भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील मोठी लोकसंख्या शेतीशी (Agriculture) निगडित आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे पेरून चांगले उत्पादनही मिळते. परंतु प्रगत शेतीसाठी (Department of Agriculture) सुपीक जमीन असणेही आवश्यक आहे. देशातील अनेक भागांत जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी सेंद्रिय आणि बिगर सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) वापर करतात. डीएपी, युरियासह काही खते भारतात वापरली जातात. आता केंद्र सरकारने इतर खतांच्या वापरावर भर दिला आहे.

शेतकऱ्यांचं पीक येईल जोमात
शेतकऱ्यांनी जर एसएसपी या खताचा वापर शेतीमध्ये पिकासाठी केला, तर पीक नक्कीच जोमात येईल. यामुळे पीक उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक (Financial) परिस्थिती सुधारेल. शेतकऱ्यांनी या खताचा जास्तीत जास्त वापर करावा. शेतकऱ्यांना या खताचा (Chemical Fertilizer) पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा यासाठी केंद्र सरकार देखील जोरदार तयारीत आहे. म्हणूनच सरकारने या खताच्या वापरा सोबत उत्पादन उद्दिष्टावर देखील लक्ष केंद्रित केले आहे.

एसएसपी खताचे उत्पादन उदिष्ट
केंद्र सरकार एसएसपी खत उत्पादनाला (SSP Fertilizer Production) चालना देण्यासाठी काम करत आहे. एसएसपी खत जमिनीसाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. भविष्यात डीएपी आणि युरियाला पर्याय म्हणूनही तज्ज्ञ घेत आहेत. याबाबत नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी एसएसपी खताच्या जाहिरातीवर भर दिला.

खताच्या गुणवत्तेची घ्यावी काळजी
रसायने आणि खते सचिव अरुण सिंघल म्हणाले की, एसएसपी उद्योगाला खतांच्या गुणवत्तेची काळजी घ्यावी लागते. देशातील शेतकरी कोणत्याही प्रकारे तोटा सहन करण्याच्या स्थितीत नाही. एखाद्या उद्योगाने चूक केली तर त्याचे नुकसान सर्वांनाच भोगावे लागते. म्हणूनच एसएसपी उद्योगाने एकत्र येऊन गुणवत्तेवर काम करणे आवश्यक आहे. सध्या देशात 53 लाख मेट्रिक टन एसएसपी खताचे वार्षिक उत्पादन होत आहे. त्यातून वर्षाला एक कोटी मेट्रिक टन उत्पादन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

उत्तम दर्जाचे खत बनवा…
केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले की, शेतकऱ्यांची अजिबात फसवणूक होऊ नये. एसएसपी इंडस्ट्रीजने चांगल्या दर्जाची खते बनवली. त्याचा पुरवठा देशात झाला पाहिजे. दर्जा चांगला असो वा नसो, उद्योगांना एनएबीएल प्रमाणित आधुनिक प्रयोगशाळा स्थापन कराव्या लागतील. कोणतेही उत्पादन बाजारात येण्यापूर्वी त्यात कोणतीही कमतरता नाही हे स्पष्ट केले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा विश्वास जिंकायचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post