राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता


 

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

सध्या विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

राज्यात सध्या पाऊस आणि थंडीचा खेळ आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात थंडीचा कडाखा वाढला आहे. तसेच मुंबईतही (Mumbai) तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

तसेच मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. तापमानाचा पारा 9 अंशावर गेला आहे. राज्यात नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. यामुळे कधी पाऊस पडेल आणि कधी हवामान थंड होईल, हे देखील समजत नाही. अचानक वातावरणात बदल होत आहे.

तसेच मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. यामुळे येणारे काही दिवस महत्वाचे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post