डिझेलवर नाही तर थेट शेणावर चालणार ‘हा’ ट्रॅक्टर

farming tractor


 डिझेलवर नाही तर थेट शेणावर चालणार ‘हा’ ट्रॅक्टर

Tractor | शेतीतील कामे जलद होण्यासाठी आणि मनुष्यबळाचा कमी वापर व्हावा यासाठी आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा (Tractor Subsidy) वापर केला जातो. परंतु आज पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढलेले पाहता शेतकऱ्यांना शेतीमध्ये (Department of Agriculture) ट्रॅक्टरने मशागत करणे परवडत नाही. या वाढत्या ट्रॅक्टरच्या मशागतीच्या खर्चावर (Financial) शेतकऱ्यांना जबरदस्त तोडगा मिळाला आहे. कारण आता ट्रॅक्टर चालण्यासाठी डिझेलची (Diesel Rate) गरज भासणार नाही, तर आता ट्रॅक्टर थेट शेणावर चालणार आहे.

शेणावर चालणार ट्रॅक्टर
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारा हा ट्रॅक्टर सर्व गुणांनी समृद्ध असलेल्या गाईच्या शेणावर चालणार आहे. विविध कामांसाठी उपयुक्त असणारे गाईचे शेण आता ट्रॅक्टर (Top Farming Tractors) चालण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. गाईच्या शेणावर चालणारा हा ट्रॅक्टर ब्रिटनमधील एका कंपनीने बनवला आहे. जिचं नाव ‘बेनामन’ असे आहे, या कंपनीने शेणापासून बनणाऱ्या मिथेल वायुवर चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे.

प्रदूषणही करेल कमी
गाईच्या शेणावर चालणारा हा ट्रॅक्टर प्रदूषणावरही मात करणार आहे. कारण डिझेल झाल्यामुळे तयार होणारे वायू प्रदूषण आता आटोक्यात येणार आहे. नैसर्गिक पद्धतीने बनणारा हा मिथेन वायू ट्रॅक्टर चालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण देखील कमी होणार आहे.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
सर्वप्रथम या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) खर्चाबाबत होणार आहे. कारण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एक एकर मशागतीसाठी 2 हजार रुपये ते 2 हजार 500 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे शेती अधिकच खर्चिक बनली आहे. आता डिझेलची गरज नसल्याने शेतकरी सहज पद्धतीने शेतीची मशागत करू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा खर्चही वाचणार आहे. इतकच नाही, तर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची पावर आणि शेणावर चालणाऱ्या ट्रॅक्टरची पावर अगदीच समान आहे. या ट्रॅक्टरची पॉवार 270 हॉर्स पॉवर एवढी आहे.

कशी होते बायोमिथेन वायूची निर्मिती?
या बायोमिथेनची निर्मिती कशी होते ते पाहूया. सेना पासून चालणारा ट्रॅक्टरची निर्मिती करणारी बेनामन कंपनी जवळपास एक दशकांपासून या बायोमिथेन वायूवर संशोधन करत आहे. या कंपनीने जवळपास 100 गाईंच्या गोठ्यामध्ये बायोमिथेन उत्पादनाकरता युनिट तयार केले आहे. तर याचं युनिटमध्ये गाईचे शेण आणि मूत्र गोळा करुन याद्वारे बायोमिथेनची निर्मिती केली जाते. याच बायोमिथेनवर चालणारा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post