शेतकऱ्यांसाठी खशखबर! दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, उद्यापासून नवे दर होणारं लागू
दुधाच्या दरात वाढ
दुग्ध व्यवसाय शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना या बातमीमुळे आर्थिक (Finance) दिलासा मिळणार आहे. तसेच आणखी जोमात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील प्रोत्साहन मिळणार आहे. कारण आता पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दुधाच्या दरात (Milk Price Hike) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती रुपयांची झाली वाढ?
पुणे जिल्हा उत्पादक संघाने दुधाच्या दरामध्ये (Milk Rate) प्रति लिटर मागे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दुधाचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासोबत प्रतिलिटर 37 रुपये 80 पैसे असणार आहे. हे दुधाचे नवे दर 1 फेब्रुवारी 2023 म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहे.
सध्या महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे दूध वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च येत आहे. पशुखाद्याचे आणि चाऱ्यांचे दर देखील वाढले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी दिलेला दर परवडत नाही. तर दुसरीकडे लंबी आजारामुळे देखील शेतकरी आर्थिकरित्या चांगलाच डब्यात गेला आहे. थोडक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूनेच ही दरवाढ करण्यात आली आहे.