कापूस उत्पादकांची चांदी! कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत; जाणून घ्या किती मिळतोय भाव?
Cotton Rate | बाजारात सध्या कापूस विक्री सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ-उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात जवळपास 7 टक्क्यांनी चढ-उतार झालेला पाहायला मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) काहीसा दिलासा मिळाला. परिणामी देशातील बाजारात देखील कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली.
कापसाच्या दरात होणार वाढ
गेल्या आठवड्याभरात कापसाच्या दराततील बदलणाऱ्या या घडामोडीनंतर आता या आठवड्यात देखील कापसाचे दर (cotton market) वाढण्याचे संकेत मिळत आहेत. काल बाजारामध्ये कापसाच्या दरात शंभर रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (financial) होणारा चढ-उतार पाहता कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
आठवड्याभरात वाढले कापसाचे दर\nमागच्या आठवड्यामध्ये कापसाला (Cotton Crop) प्रतिक्विंटल 7 हजार 600 ते 8 हजार 300 रुपये इतका सरासरी दर मिळाला. परंतु, कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होत गेली. कापूस दर सुधारल्यामुळे शेतकऱ्यांचे (Agriculture Information) मनोबल देखील वाढले.
किती मिळतोय कापसाला भाव?
गेल्या आठवड्याभरात कापसाच्या दरात जवळपास 800 ते 1000 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. कारण गेल्या आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार 600 ते 8 हजार 300 रुपये इतका सरासरी दर मिळत होता. तर दुसरीकडे आता या आठवड्यात कापसाला 7 जानेवारी 2023 रोजी 8 हजार 600 ते 9 हजार 100 रुपये इतका मिळाला.