शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फळपीक विम्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी
Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध पिकांसाठी योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीसाठी दिलासा देण्यासाठी पिक विमा (Crop Insurance) योजना राबवली जाते. आंबिया बहार पीक विमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत फळबागांसाठी निधी वितरीत करण्यात येतो. आता याच योजनेची महत्वपूर्ण आणि आनंदाची माहिती समोर आली आहे.
फळपीक विण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय 13 मार्च 2023 रोजी घेण्यात आले आहेत. आंब्या बहार फळ पिक विमा योजनेअंतर्गत फळपिकांसाठी नैसर्गिक आपत्ती पासून विम्यांतर्गत संरक्षण देण्याचे काम केले जाते. यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
कोट्यवधींचा निधी वितरीत
आंबिया बहार फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी महसूल मंडळ निश्चित करून ही योजना राबवली जाते. आता मृग बहार 2022 करता शासन निर्णय घेण्यात आला आहे. आता यासाठी शेतकऱ्यांना 22 कोटी 40 लाख 58 हजार 878 रुपये इतका निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हा निधी तीन वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे योजनेचे उद्दीष्ट?
- आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विमा.
- कोणत्याही परिस्थितीत (नैसर्गिक आपत्ती/ हवामान) मन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणे.
- शेतकऱ्यांना नवीन सुधारित मशागती तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यामध्ये सातत्य राखणे.