शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा
Incentive Subsidy | शेती करताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते, यासाठी शेतकरी कर्ज काढतात. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. तर काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात. आता आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान (Incentive Subsidy) देण्यात येत आहे. आता याच अनुदानासाठी शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरण्यासारखी बातमी समोर आली आहे.
50 हजारांचे अनुदान जमा
हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजारांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यांमधील 10 हजार 257 लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात 25 कोटी 64 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली आहे.
पीक कर्ज
ही माहिती देताना पापळकर म्हणाले की, “चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 1 लाख 36 हजार 639 शेतकऱ्यांना 931 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप करत 76.82 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलय. पीक कर्ज वाटपात मागच्या पाच वर्षांतील उच्चांकी कर्ज वाटप आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. पीक कर्जाचे नूतनीकरण दरवर्षी 30 जूनपर्यंत केल्यास शासनाकडून 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर व्याज परतावा देण्यात येतो.”
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार
राज्य सरकारकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.