Cotton Rate | सध्या बाजारात कापसाची विक्री सुरू आहे. तर देशामधील कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास चार-पाच महिने उलटले आहे. पहिल्या तीन महिन्यांत कापसाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला होता. यामुळे कापूस (Cotton Rate) उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. परंतु आता आगामी काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील कापसाचे दर (Cotton Rate) सुधारतील का नाही.
चालू महिन्यात कापसाचे दर दबावात
मार्च महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात कापसाच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. ज्याचं कारण म्हणजे देशातील बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. तसेच अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रामधील संकटामुळे बाजार दबावात आहे. म्हणूनच कापसाचे दर दबावात आहे. त्यासह कापूस उत्पादन घटण्याची अंदाज वर्तवण्यात आला असून देखील याचा दरावर कोणताही परिणाम होत नाहीये.
देशातील कापसाची आवक कशी आहे?
चालू महिन्यात बाजारातील कापसाची आवक वाढली आहे. याचा परिणाम थेट दारावर होत आहे.
सध्या मार्चमध्ये कापसाची आवक सरासरी 60 ते 65 हजार गाठींदरम्यान असते. परंतू, सध्या देशातील बाजारात कापसाची आवक 1 लाख 20 ते 1 लाख 35 हजार गाठींच्या दरम्यान आवक होतेय. म्हणूनच कापसाचे दर दबावात आहेत.
कापसाचे दर सुधारणार का?
देशातील बाजारात कापसाचे दर सुधारतील का? नाही हे जाणून घेऊयात. तर देशात सध्या कापसाला 7 हजार 700 ते 8 हजार 100 रुपये दर मिळत आहे. कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने एप्रिल महिन्यात कापसाचे दर सुधारू शकतात. मात्र, कापसाच्या दरात 300 ते 400 रुपयांची वाढ होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.