शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ३६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ

 


Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme | भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील अनेक नागरिक शेती हा व्यवसाय करतात. पण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते. तर कधी पाणी नसल्यामुळे शेतातील पिके जळून जातात. पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन जातो. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एका योजनेची सुरुवात केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ही योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पाठबळ देणे आणि कर्जमुक्त करणे आहे. या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

जाहीर केलेल्या अनुदानानुसार, जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी शेतकरी आहेत. तर १ लाख २७ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केलेली आहे. ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी अध्यापही आधार ई-केवायसी केलेली नाही. पहिल्या यादीत ४८ हजार तर दुसर्‍या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. यादी लवकरच जाहीर होणार असून शेतकऱ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे. यापुर्वी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते.

काय आहे योजना?
शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या वतीने २२ जून २०२२ च्या नियमाप्रमाणे निकष जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये २०१७ ते २०१९- २० या कालावधीमध्ये कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post