Crop Damage | गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. थेट शेतीतील पिक उत्पादनावर (Crop Damage) याचा परिणाम झाला होता. यामुळे शेतीमाल कमी निघाला आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे (Crop Damage) नुकसान झाले असल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिवृष्टी भरपाईची घोषणा
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेऊन 17 नोव्हेंबर 2022 रोजी जालना जिल्ह्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आली होती. याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे समोर आले आहे. या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीच्या निधीची घोषणा करण्यात आली होती
किती निधी झाला मंजूर?
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जालना जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार शेतकऱ्यांसाठी 397 कोटी 73 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. आता याच निधीचे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1286 कोट रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
कोणाला मिळणार मदत?
जालना जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्या पात्र शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण होणार आहे. 24 तासांमध्ये 63 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेल्या तसेच 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.