Shram Vidya Shaikshanik Karj Yojana |मागील काही वर्षात सलग आलेल्या आर्थिक संकटांमुळे अनेक शेतकरी हतबल झालेत. याकाळात राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या (Sucides ) देखील केल्या आहेत. दरम्यान या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाच काय ? हा प्रश्न उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर एका नुकतीच एका नवीन योजनेची (New Scheme) घोषणा करण्यात आली आहे.
असे मिळणार कर्ज
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ (Shram Vidya Shaikshanik Karj Yojana) ची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत या मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच पाच ते दहा लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के आणि दहा ते १५ लाखांपर्यंतचे कर्ज चार टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्य सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
नुकतेच राज्य बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात कर्ज योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्य बँकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे कौतुक केले. राज्य सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून अनेक शेतकरी कुटुंबातील मुलांनी त्यांचे शिक्षण या योजनेद्वारे पूर्ण करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी केले.
काय आहे ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ ?
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क लागणार नाही. तसेच पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत अंतिम परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सहकारी बँकेकडून ५० हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. तसेच ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
Eligiblity |पात्रता
१) सन २०२३ पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
२) बारावीनंतर कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेस पात्र असतील.
या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी राज्या सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.