राज्यात बैलगाडा शर्यतींसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी !
बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात गावागावांत यात्रा व समारंभांच्या निमित्ताने खास बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात होते. मातीचा धुराळा उडवत पळणारे बैल…त्यानंतर गुलालाने होणारा जल्लोष हे चित्र मागील काही दिवसांत दिसेनासे झाले होते.
कारण, मागील अनेक दिवसांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी बैलगाडा शर्यतीसाठी मान्यता दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. यामध्ये राज्यात बैलगाडा शर्यतील सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयाकडून परवानगी
यामुळे राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचा थरार व मातीतला धुराळा पहायला मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी, बैलगाडा चालक-मालक व बैलगाडा शौकिनांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी गुलाल उधळून जल्लोष केला जात आहे
बैलगाडा शर्यतींमुळे ग्रामीण भागात अर्थकारण
खरंतर ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींमुळे उभे राहिलेले मोठे अर्थकारण आहे. यात्रा व समारंभांच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. यामुळे कित्येक लोकांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून राहिल्या होत्या.
अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बैलगाडा शर्यतींना मान्यता दिली होती. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ‘बैल हा धावणारा बैल आहे’ यावर एक अहवाल सादर करावा लागला. हा अहवाल सादर झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.