7/12 | मोठी बातमी! 7/12 वरील राखीव शेरे हटवून निर्बंध उठवणार; जमिनीवर कर्ज आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मार्ग मोकळा

 





7/12 | मोठी बातमी! 7/12 वरील राखीव शेरे हटवून निर्बंध उठवणार; जमिनीवर कर्ज आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मार्ग मोकळा


सध्या विधानसभेत शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. अलीकडेच राज्याचे कृषिमंत्री यांनी बियाणे कायदा तसेच पीक विम्याची 72 तासांची अट 92 तासांवर नेण्याची मागणी केली आहे. त्यांनतर आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मुद्दा विधानसभेत मांडला गेला आहे. ज्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेरे हटवून निर्बंध उठवणार
राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र भूधारकांच्या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्यासाठी 7/12 उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असे मारलेले शेरे कमी करून खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर शेरे आणि निर्बंध आहेत. हेच शेरे तात्काळ उठवले जावेत अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
खरं तर, शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर हे पुनर्वसनासाठी राखीव’ असे मारलेले शेरे असल्याने जमिनीचे व्यवहार म्हणजेच खरेदी विक्री होत नव्हती. तसेच शेतकऱ्यांना जमिनीवर कर्ज देखील मिळत नव्हते. हेचशेरे हटवून शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी विखे पाटलांनी विधानसभेत ही मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post