Agricultural Advice | शेतकऱ्यांनो राज्यात पावसाचे ‘असे’ राहणार वातावरण! त्वरित जाणून घ्या हवामान आधारीत कृषी सल्ला
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक १९ ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाशआंशिक ढगाळ ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक १९, २० व २१ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतीतील कामे कशी करावीत याबाबत माहिती जाणून घेऊयात.
- सार्वत्रिक स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता लक्षात घेता,आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामेआणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ पुढे ढकलावी तसेच पिकास ओलीत करणे टाळावे.
- पावसाचे पाणी दीर्घ काळ शेतात साचून राहणार नाही यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- शेतकरी बांधवांनी कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणण्यासाठी पिकाचे नियमित निरीक्षण करावे तसेच शिफारशीनुसार पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रणाच्या उपाययोजनाचा अवलंब करावा.
- विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय,
- म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.
- जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे.
- पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.