Agriculture Scheme | शेतकऱ्यांनो तुम्ही फक्त फळबागा लावा! सरकारने ‘या’ योजनेसाठी दिली तब्बल 200 कोटींच्या निधीस मान्यता






Agriculture Scheme | शेतकऱ्यांनो तुम्ही फक्त फळबागा लावा! सरकारने ‘या’ योजनेसाठी दिली तब्बल 200 कोटींच्या निधीस मान्यता


शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. इतर पिकांसोबत फळपिके (Orchard scheme) देखील मोठ्या प्रमाणात घ्यावी यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. फळबागांच्या शेतीमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा कमवू शकतात. परंतु फळ पिके पिकवणे खर्चिक देखील आहे. शेतकरी याकडे थोडा का होईना कानाडोळा करतात. म्हणूनच राज्यात ‘राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ (एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी अर्ज ) राबवले जाते. आता याबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Objective of Horticulture Scheme | फलोत्पादन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या अभियानांतर्गत समाविष्ट पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. शेत जमीनीची सुपिकता व उत्पादकता यात वाढ करणे, रोजगाराच्या नवीन राधी निर्माण करणे व एकूणच शेतकयांच्या उत्पन्नात वाढ करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

Funding for Integrated Horticulture Development | एकात्मिक फलोत्पादन विकासाठी निधी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2023-24मध्ये राज्यात राबवण्यासाठी अर्थसंकल्पित तरतुद करण्यात आलीय. केंद्र शासनाने मंजूर केलेला वार्षिक कृती आराखडा विचारात घेता योजनेची सन 2023-24, अंमलबजाणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. या योजनेसाठी आर्थिक वर्षात तब्बल 21207.25 लाख रुपये दोनशे बारा कोटी सात लाख पंचवीस हजार फक्त) इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post