Kusum Solar Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा?
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत (Kusum Solar Yojana) अनुदानावर सोलर पंप दिले जात आहेत. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत. याच लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Self survey messages to the beneficiaries of PM Solar Yojana started | पीएम सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज सुरू
प्रधानमंत्री कृषी सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज येऊ लागले आहेत. त्यांना आता सेल्फ सर्वेचा ऑप्शन आला असून त्यांना हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये प्लेस्टोअरवरून महाऊर्जेचं ‘मेडा’ नावाचं ऍप डाऊनलोड करावे लागेल. हे ऍप केवळ ‘कुसुम ब’च्या लाभार्थ्यांसाठी आहे. यावर तुम्हाला सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनवर सर्व्हे करावा लागेल. त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम योजना व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
What is the ground condition for Kusum Solar | कुसुम सोलरसाठी जमीनीची अट काय आहे?
जर एखाद्या शेतकऱ्याकडे 2.5 एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 3 Hp सोलर पंपाची (Kusum Solar Beneficiary) मागणी करू शकतो. पण त्याहून कमी क्षेत्र असलेला शेतकरी यासाठी अर्ज करू शकत नाही. त्याचबरोबर 5 एकर जमिनीसाठी 5 HP व त्याहून जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC पंप मिळू शकतो. त्यासह 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असणारा शेतकऱ्याला जर 10 HP चा सोलर पंप हवा असेल तर शासनाच्या माध्यमातून 7.5 HP पर्यंतचा खर्च देण्यात येतो. उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागणार आहे. तर या सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लाख (3 HP), रु. 2.225 लाख (5 HP), रु. 3.435 लाख (7.5 HP) इतकी आहे.
Required Documents for Kusum Solar | कुसुम सोलरसाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- आधारकार्ड प्रत.
- रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
- पासपोर्ट आकाराचा फोटो,
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.