CM Medical Assistance Fund | ब्रेकींग! ‘मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी’साठी हेल्पलाईन नंबर जारी; आता तात्काळ लाभ मिळणे झाले सोपे
राज्यातील गरीब गरजू लोकांसाठी योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना अर्थसहाय्य करण्याचे काम करत आहे. याचप्रमाणे राज्यातील आपत्तीग्रस्तांना, गरजूंना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना मदत करण्यासाठी राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ (CM Medical Assistance Fund) ही योजना राबवण्यात येते. याच योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Helpline released for Chief Minister’s Aid Fund | मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हेल्पलाईन जारी
Helpline released for Chief Minister’s Aid Fund | मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हेल्पलाईन जारी
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी मोबाईल ऍप तथा व्हॉट्स ऍप हेल्पलाईनचा जारी करण्यात आला आहे. ज्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. आता राज्यातील आर्थिक दुर्बल असलेल्या नागरिकांना सहजपणे मदत मिळणे शक्य होणार आहे.
Helpline for Chief Minister’s Aid Fund | मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हेल्पलाईन
त्याचवेळी नागरिकांसाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात 12 हजार 500 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. ज्यासाठी तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.