Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे आगाऊ पिक विम्यासाठी पात्र




Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे आगाऊ पिक विम्यासाठी पात्र


पावसाळा नुसता नावाला सुरू झाला आहे. शेतीसाठी पुरेसा असा काही पाऊस काही पडण्याचं नाव घेत नाहीये. म्हणूनच शेतकरी या संकटात सापडले आहे. एकीकडे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर दुसरीकडे आता या पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या होऊनही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पिक विम्याबाबत (Crop Insurance) कृषी आयुक्तांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. तर यामध्ये परभणी जिल्ह्याच्या समावेश आहे.

राज्यातील 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून पावसाचा खंड आहे. यामुळे पेरण्या करूनही पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याचा परिणाम थेट पीक उत्पादनावर होणार आहे. आता यात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत 25% आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. याबाबतची तरतूद पिक विमा योजनेमध्ये आहे.

Mandals in Parbhani district are eligible परभणी जिल्ह्यातील मंडळे पात्र
परभणी जिल्ह्यात जुलैपासून पावसाचा खंड पडला आहे. ज्यामुळे पेरण्या करूनही शेतकऱ्यांना मोठ नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे होणाऱ्या सोयाबीनच्या हानीकारक नुकसान भरपाईसाठी पीएचपी पीकच्या निकषानुसार जिल्हाधिकार्‍यांकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्हयातील 11 महसूल मंडळ आगाऊ पिक विम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ विमा खातेदारांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

11 Board approves advance insurance compensation 11 मंडळ अग्रीम विमा भरपाई मंजूर
परभणीमधील शिंगणापूर, दैठणा, पूर्णा तालुक्यातील ताडकळस, लिमला, केकरा जिंतूरमधील संपूर्ण जिंतूर, पाथरी, समूह पाथरी, बाभळगाव, पाल मानव, पेठ शिवणी, रावराज, शेलु सेलू या मंडळाचा समावेश आहे. परभणी पिक विमा 11 मंडळ अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post