Pocra Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानासाठी तब्बल 117 कोटींचा निधी मंजूर; जाणून घ्या सविस्तर

 






Pocra Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानासाठी तब्बल 117 कोटींचा निधी मंजूर; जाणून घ्या सविस्तर


राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील 932 गावे. अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक 17 फेब्रुवारी 2012 च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत (Pocra Scheme) निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णयान्वये सन 2023 -24 मध्ये एकूण 176.80 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून सदर निधी खर्ची पडलेला आहे.

शासन निर्णय
सन 2023-24 करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना बाह्य हिश्श्याचा 117 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी उपलब्ध करुन दिलेला बाह्य हिश्श्याचा 117 कोटींचा निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या बाह्य हिश्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन 2023-24 मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या 117 कोटी निधीचे कोषागारातून आहरण व वितरणाकरीता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विहित पद्धतीने तात्काळ विनियोग करण्यात यावा. तसेच प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी 33 अर्थसहाय्य या उद्दिष्टशीषाखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.



Post a Comment

Previous Post Next Post