Wildlife Attack | राज्य शासनाचा मोठा निर्णय! वन्यप्राण्यांच्या हल्ला नुकसान भरपाईत वाढ; मृत्यू झाल्यास 25 लाख तर जखमी झाल्यास ‘इतके’

 





Wildlife Attack | राज्य शासनाचा मोठा निर्णय! वन्यप्राण्यांच्या हल्ला नुकसान भरपाईत वाढ; मृत्यू झाल्यास 25 लाख तर जखमी झाल्यास ‘इतके’


अनेकदा शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्यांवर वन्यप्राणी हल्ला (Wildlife Attack) करतात. या प्रकरणात शेतकऱ्यांची जीवितहानी होते. म्हणूनच शेतकऱ्यांना उपचारासाठी मदत दिली जात आहे. वाघ, बिबटया, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती. रानकुत्रे, रोही व माकड वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. ज्यात आता वाढ करण्यात आली आहे.

तातडीचा उपचारासाठी मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकवेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तिला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत. याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काहीवेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तिला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय

सध्याच्या आर्थिक तरतूदित मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तिला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. जनप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत होणान्या मागणीस अनुसरुन वन्यप्राणी हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी प्रकरणी देण्यात येणा-या अर्थसहाय्य रक्कम / खर्च वाढ करण्याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

नुकसान भरपाई वाढ

  • व्यक्ती मृत्यू पावल्यास: 25,00,000 रुपये (रु. पंचवीस लक्ष फक्त )
  • व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास: 7,50,000 रुपये (रु. सात लक्ष पन्नास हजार फक्त)
  • व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास: 5,00,000 रुपये (रु. पाच लक्ष फक्त)
  • व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास: औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे आगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50,000/- (रु. पन्नास हजार फक्त) प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय / जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

Post a Comment

Previous Post Next Post