LPG Cylinder Price | सामान्यांसाठी खुशखबर! महिन्याच्या सुरवातीलाच पुन्हा गॅसच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आता किती मोजावे लागतील पैसे?




LPG Cylinder Price | सामान्यांसाठी खुशखबर! महिन्याच्या सुरवातीलाच पुन्हा गॅसच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आता किती मोजावे लागतील पैसे?


घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल आणि गॅस वितरण कंपन्यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत मोठी कपात केली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या शहरांमध्ये त्याची किंमत 150 रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत प्रति सिलिंडरची किंमत 157 रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या 2 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर, व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial Gas Price) किंमत 250 रुपयांहून अधिक कमी झाली आहे.

What are the gas rates? किती आहेत गॅसचे दर?
या कपातीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1522.50 रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत त्याची किंमत 1680 रुपये होती. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 157 रुपयांनी कमी झाली आहे. कोलकातामध्ये आजपासून सिलेंडर 1802.50 रुपयाऐवजी 1636 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी त्याची मुंबईत किंमत 1640.50 रुपये होती, जी आता 1482 रुपयांवर आली आहे.

त्याचवेळी, चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 157.5 रुपयांनी कमी झाली आहे. आता 1852.50 रुपयांऐवजी 1695 रुपयांना मिळणार आहे. जर आपण दोन महिन्यांबद्दल बोललो तर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 257.5 रुपयांनी कमी झाली आहे. जुलै महिन्यात येथील भाव 1780 रुपये होते.

Domestic gas cylinder price reduced by Rs.200 | घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात
29 ऑगस्ट रोजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची (एलपीजी) किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सरकारच्या या नव्या निर्णयानंतर आता एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना विकले जात आहेत. ग्राहकांना आता 200 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहेत. मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. तेल कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post