Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान ते पिक विम्यापर्यंत वाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय
सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना एका फोनद्वारे, 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे.
Crop insurance पिक विमा
महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Complete exemption in stamp duty to various companies of the Centre केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता आणि जमिनीच्या हस्तांतरण दस्तांवर मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Loans to distressed sugar mills अडचणीतील साखर कारखान्यांना कर्ज
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Necessary planning in the face of rain पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.