POCRA | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पोकरा योजनेसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी खात्यावर होणार जमा







POCRA | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पोकरा योजनेसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी खात्यावर होणार जमा



राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Approval of crores of funds for Pokra scheme पोकरा योजनेसाठी कोट्यवधींच्या निधीस मान्यता

सन २०२३-२४ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रु. ११६.८०८ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.

प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा. प्रकल्पाच्या राज्य हिश्श्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन ३३- अर्थसहाय्य २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

Post a Comment

Previous Post Next Post