Tur Price | तुरीचे भाव कायम टिकून राहणार का? तुरीच्या भावावर आयातीचा दबाव येणार का? जाणून घ्या





Tur Price | तुरीचे भाव कायम टिकून राहणार का? तुरीच्या भावावर आयातीचा दबाव येणार का? जाणून घ्या


तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीचे भाव टिकून असल्याने सरकारची मात्र चिंता वाढली आहे. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार धडपड करतंय. पण तुरीच्या दरवाढीचा दोर सरकारला आखडता येईना. पण आता आफ्रिकेतून तुरीची आयात सुरु होणार आहे. पण यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी तुरीचे भाव (Tur Price) तेजीतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Will the price of Turi last forever? तुरीचे भाव कायम टिकून राहणार का?
 
तुरीचे भाव मागील तीन महिन्यांपासून एका भावपातळीवर दिसतात. पण ही भावपातळी सरकारची डोकेदुखी ठरत आहे. बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तुरीचे भाव तेजीत असल्याने डाळीच्या भावाने चांगलीच उचल घेतली. बाजारातील तूर आवक कमी असल्याने दराला सातत्याने आधार मिळत आहे. त्यातच सध्या सणांमुळे तुरीला मागणी वाढलेली दिसते. यामुळे दर तेजीतच आहेत.

Since when was the import of trumpets from Africa? आफ्रिकेतून तुरीची आयात कधीपासून?
आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीची काढणी आता शेवटच्या टप्प्याकडे जात आहे. आफ्रिकेत तूर खात नाहीत. हे देश निर्यातीसाठीच तुरीचे उत्पादन घेतले जाते. तेही भारतासाठी. कारण जगात भारत हा एकमेव तुरीचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. इतर देश भारताला निर्यातीसाठीच तुरीचे उत्पादन घेत असतात. आता आफ्रिकेतील माल बाजारात येत आहे. आफ्रिकेतील तूर भारतातही या महिन्याच्या शेवटीपासून दाखल व्हायला सुरुवात होऊ शकते. ऑक्टोबरपासून आयातीचे प्रमाण वाढू शकते.

How much pressure will imports put on the price of pipe? आयातीचा तुरीच्या भावावर किती दबाव येईल?
आफ्रिकेतून तूर आयात वाढल्यास काही काळ दरावर दबाव येऊ शकतो. मात्र दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत. कारण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. देशातील तूर लागवड यंदा गेल्यावर्षीपेक्षाही घटली. त्यातच दुष्काळी स्थितीचा फटका पिकाल बसत आहे. त्यामुळे यंदा देशातील तूर मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काळातही तुरीचे भाव तेजीत राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post