LPG Gas Subsidy | आनंदाची बातमी! 2024-2025 मध्येही मिळणार एलपीजी गॅसवर 300 रुपये सबसिडी, वाचा सविस्तर

 

LPG Gas Subsidy | 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. यातच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी संबंधित एक मोठा
बदल लागू होणार आहे


उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!

300 रुपयांची सबसिडी पुढील वर्षीही सुरू


2024-25 मध्येही उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG सिलिंडरवर मिळणारी 300 रुपयांची सबसीडी पुढील वर्षात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. 31 मार्च 2024 पर्यंत असलेली ही (LPG Gas Subsidy) आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

देशात निवडणूक, तरीही गरीबांना दिलासा

देशात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यापूर्वीच मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब महिलांना दिले जाणारे 300 रुपये प्रति एलपीजी सिलिंडरचे अनुदान सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. आता 1 एप्रिल 2024 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

वाचा | Most Expensive Cow | काय सांगता? तब्बल ४० कोटिंना विकली गाय, जाणून घ्या नेमकी तिची जात काय?

सबसिडीत वाढ, लाभार्थ्यांची संख्या वाढली

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने 14.2 किलो एलपीजी सिलिंडरवरील सबसीडी एका वर्षात 12 रिफिलसाठी 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत केली होती. या निर्णयामुळे लाभार्थ्यांची संख्या 8 कोटींवरून 10 कोटींपर्यंत वाढली.

सरकारवर 12,000 कोटी रुपये खर्च

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, आर्थिक घडामोडींसंबंधीत कॅबिनेट समितीने (CCEA) ही सबसिडी 2024-25 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 10 कोटी कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता आहे आणि सरकारवर 12,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मे 2016 मध्ये सुरू झाली योजना

ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मे 2016 मध्ये सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) सुरू केली. या योजनेअंतर्गत गरीब घरातील महिलांना मोफत LPG कनेक्शन आणि 300 रुपयांची सबसिडी दिली जाते.

उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी:

  • लाभार्थी गरीब कुटुंबातील महिला असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थी कुटुंबाकडे आधीच LPG कनेक्शन नसावे.

Post a Comment

Previous Post Next Post