Weather Update | शेतकऱ्यांनो गहू-बाजरी लवकर काढा! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार पाऊस

 Weather Update | शुक्रवारी (ता. २९) विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पावसाच्या (Weather Update) सरी कोसळल्या. नाशिक, धुळे, नंदुबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, वाशिम, अकोला यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

काही भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने फळबागांसह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीची तीव्रता अद्याप निश्चित झाली नसली तरी, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याची बातमी आहे.


हवामान विभागाने (IMD Alert) पुढील तीन ते चार दिवस राज्यात अशीच हवामानाची परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

वाचा|Cotton Rate | कापसाच्या भावात सुधारणा, पण अस्थिरता कायम जाणून घ्या त्यामागचं नेमक कारण

हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना काढणीला आलेली पिके झाकून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील.

मराठवाड्यातील लातूर, बीड,धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यातील तापमानात घट होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे सोयाबीन, ऊस, कापूस, तूर आणि धान यांसारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकसानीची तीव्रता अद्याप निश्चित झाली नसली तरी, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी सरकारने पंचनामे करून मदत वाटप करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post